logo

सरकार आता पोहोचतेय थेट जनतेच्या दारी – ५ गावांना आदर्श बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम!

सरकार आता पोहोचतेय थेट जनतेच्या दारी – ५ गावांना आदर्श बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम!

गांगलवाडी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर, भोसी, मुर्तीजापूर-सावंगी, गांगलवाडी आणि रामेश्वर या पाच गावांना आदर्श गाव बनवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने “पाचगाव योजना” राबवण्यास सुरूवात केली आहे.

या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या १७ विभागांच्या योजना थेट गावातच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
उदाहरणार्थ – आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, रेशन सुधारणा, ई-श्रम कार्ड, आधार सेवा, महिला व बालकल्याण, जल जीवन मिशन, सीएससी सेवा केंद्र, महसूल, पशुसंवर्धन, ऊर्जा, ग्रामविकास, सामाजिक न्याय इत्यादी विभागांचे अधिकारी गावात उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत.

नागरिकांना योजना मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची –
(आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक वगैरे) माहिती देण्यात आली.
ज्यांच्या कागदपत्रांत त्रुटी होत्या, त्यांना सुधार प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

गावातील सरपंच, तलाठी, पुरवठा निरीक्षक, डॉक्टरांची टीम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सीएससी ऑपरेटर यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.

नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितले –
"इतके अधिकारी पहिल्यांदाच आमच्या गावात आले. घरबसल्या योजनांची संपूर्ण माहिती आणि मदत मिळाली."

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट:

सरकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे
पारदर्शक व संवादात्मक प्रक्रिया
५ वर्षांत या गावांना आदर्श गाव म्हणून घडवणे

पाचगाव योजना: सिद्धेश्वर, भोसी, मुर्तीजापूर-सावंगी, गांगलवाडी आणि रामेश्वर

10
471 views
  
1 shares