logo

“कृष्णा आंधळेला अटक करा, त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका”; धनंजय देशमुखांची सरकारकडे मागणी

Krishna Andhale | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सहा महिने उलटले असतानाही आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्याप फरार आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रशासनावर थेट आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “कृष्णा आंधळेला (Krishna Andhale) अटक झाली नाही, तर मी लवकरच कठोर निर्णय घेणार असून याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची असेल,” असा इशारा त्यांनी दिला.

धनंजय देशमुख म्हणाले, “204 दिवस उलटले तरी आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. इतर प्रकरणातील आरोपी जेरबंद होतात, मग कृष्णा आंधळेला अटक का होत नाही? त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. प्रशासन आमचं संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरतंय,” अशी टीका त्यांनी केली.

न्यायालयात दबाव, आरोपींना VIP ट्रीटमेंटचा आरोप :


देशमुख कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. “बीड न्यायालयात सुनावणीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हांसह गाड्या, पदाधिकारी आणि आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे वातावरणात भीती पसरवली जाते. कुटुंबावर मानसिक दबाव निर्माण केला जातो,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच, “जेलमध्ये आरोपींना VIP ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे आम्ही मागणी केली होती की, आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात यावं, पण ती मागणीही सरकारने फेटाळली. त्यामुळे आम्ही आता तातडीने कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Krishna Andhale | संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी :


9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांची निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मकोका अंतर्गत अटक झाली असली, तरी कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

धनंजय देशमुख (Dhananjay deshmukh) यांचा आक्रमक पवित्रा पाहता, आता प्रशासन पुढील पावले काय टाकते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. “ही केवळ आमची नाही, तर न्याय व्यवस्थेचीही कसोटी आहे,” असे म्हणत त्यांनी या मागणीची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

News Title: Dhananjay Deshmukh Warns of Major Action if Krishna Andhale Not Arrested in Santosh Deshmukh Murder Case

Dhananjay Deshmukh warning

Krishna Andhale arrest

Santosh Deshmukh murder case

कृष्णा आंधळे अटक

देशमुख खून न्याय

धनंजय देशमुख संतप्त

बीड खून प्रकरण

32
1809 views