logo

'सोलर प्लांट'साठी बनावट ठराव, कागदपत्रे; नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे.


मोताळा येथील सोलर प्लांट उभारणीसाठी संगनमताने बनावट ना हरकत प्रमाणपत्र, ठरावचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नगरपंचायतला सुमारे दहा लाखांचे महसूल (शुल्क) बुडाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.या प्रकरणी नगरपंचायत च्या अध्यक्ष, कर्मचारी, सोलर कंपनीचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळ, औद्योगिक क्षेत्रासह मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक, नगर पंचायत कंत्राटी कर्मचारी आणि कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यासह एकूण पाच जणांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मोताळा नगर पंचायत अध्यक्षा माधुरी देशमुख (रा. मोताळा, जि. बुलढाणा ) अमोल शिवाजी देशमुख (स्वीकृत नगरसेवक मोताळा नगर पंचायत, रा. मोताळा, जि. बुलढाणा), सन पॉवर इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, कॅम्प मोताळा) चे व्यवस्थापक (व्यवसाय वृद्धी) महेश सहाणे (रा. सावरगाव पाठ, ता. अकोले, जि. अहमदनगर), शांताराम सुपडा लोखंडे (४८, सन पॉवर इंडीया कॅम्प मोताळा, रा. रुईखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) नगराध्यक्ष माधुरी पुरुषोत्तम देशमुख (५२, रा. मोताळा, जि. बुलढाणा), सुनिल ओंकार मिरकुटे (५४, आवक-जावक लिपीक मोताळा नगरपंचायत) अशी आरोपीची नावे आहेत.
या आरोपीनी आर्थीक लाभापोटी संगनमत करून मोताळा नगर पंचायत कार्यालयाचे खोटे नाहरकत प्रमाणपत्र व ठराव तयार केले. मागील ११ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत त्यांनी सभा न घेता ही बनावट कागदपत्रे तयार केली असे प्राथमिक चौकशीत आढळून आले. यामुळे नगर पंचायत कर, विक्रास शुल्क, बांधकाम शुल्क वृक्षतोड़ परवानगी शुल्क अस अंदाजे दहा लाख रुपयापेक्षा जास्त शुल्क बुडवुन शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी मध्य निष्पन्न झाले. नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पाच आरोपी विरुध्द गुन्हे दखल करण्यात आले.
मोताळ्यात कंपनी कडून महापारेषण सोबत करार करून विद्युत विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगर पंचायत मुख्याधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी,शिक्के मारून संगतमताने बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार करण्याचा पराक्रम या पाच आरोपीनी केल्याचे तक्रारीत नमुद आहे. आरोपींमध्ये नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांनी ११ एप्रिल २०२३ रोजी ला घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेचा फायदा घेत नगरसेवकांना न सांगता वेळेवरच्या विषय भासवून कंपनीला मोताळा नगर पंचायतची नाहरकत बाबत ठराव दिला आहे. म्हणूनच त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.
बोराखेडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर नगर पंचायतची फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.आरोपीमध्ये मोताळा नगर पंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगर सेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सोलर घोटाळ्यात पुढील चौकशीत आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलर घोटाळ्यात नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

15
110 views