logo

सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी निवासासाठी घरे उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दखल घेतली.

नाशिक महाराष्ट्र ए आय एम ए मिडीया पँथर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक
नाशिक महाराष्ट्र ए आय एमए पँथर क्रांतीवीर संघटना, महाराष्ट्र राज्य ह्या संस्थेचे अध्यक्ष विजय वाहुळे यांनी सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी घर देण्यासाठी महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृह निर्माण मंत्री यांना निवेदना द्वारे पाठपुरावा करून अखेर सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी घरांचा प्रश्न मार्गी लागला. या संदर्भातील पत्र कक्ष मुख्यमंत्री सचिवालय तसेच कक्ष अधिकारी गृह विभाग
महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गृह शाखा नाशिक यांना पत्राद्वारे तसेच ईमेल द्वारे
कळविण्यात येऊन एक प्रत पँथर क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष विजय वाहूळे यांना पाठविली आहे या पत्रा मध्ये शासकीय भुखंड ताब्यात घेऊन यावर सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी निवासी घरे उभारण्याचा प्रस्ताव केलेला आहे.

25
1521 views