logo

तीन मुलांचा कृत्रिम तलावात बुडून मृत्यु

नाशिक ए - आय एमए मिडीया दि. 29 जून २०२५ रोजी बीडी कामगार वसाहतीमध्ये राहणारे तीन मुले सकाळ पासुन फिरायला गेले असतांना सायंकाळ पर्यंत घरी परतले नाही म्हणुन पालकांनी रात्री आडगांव पोलीस स्टेशला मुलांचे हरविल्याचे तक्रार नोंदविली असतांना पोलीस शोध घेत असतांना मिर्ची हॉटेलच्या सार्वजनिक जागेच्या ठिकाणच्या
बिल्डरने बांधकाम करण्यासाठी खोदकाम करून मोठा खड्डा तयार करून त्याठिकाणी मज्जाव करण्यास सुरक्षा उभी केली नसतांना
तीनही मुले त्या कृत्रिम तलावात अंघोळीसाठी उतरले असतांना त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने तीन ही मुले त्यात बुडाले याची खबर पोलीसांना मिळता ते त्या ठिकाणी गेले असता तेथे काही कपडे बाहेर ठेवलेले दिसले याची ओळख करण्यासाठी त्यांनी तिन्ही मुलांच्या पालकांना बोलुन कपड्यांची ओळख पटविली असता हे कपड़े त्यांचेच आहे हे सांगितले असता लगेच अग्निशामकाला बोलवून मुलांचा शोध सुरु केले असता त्यांचे मृतदेह सापडले. यामुळे ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक नातेवाईक यांनी येथील जागेवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा न ठेवता हलगर्जी पणा केला त्यामुळे तिनही मुलांचे मृत्युस कारणीभूत असल्याने त्या बिल्डर वर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केलेली असुन पुढील तपास आडगांव पोलीस स्टेशन चे निरीक्षक करत आहे.

20
1033 views