आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील हजारो वारकरी दिंडीमध्ये सहभागी
प्रतिनिधी ३० जून (अहिल्यानगर) :- आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात आहेत. अनेक वारकरी मंडळी यामध्ये सहभागी दिसत आहेत. आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी करत जात आहेत.
या वारीमध्ये पुरुषांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला. सध्याच्या युवा पिढीला आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ मिळत नाही तरीसुद्धा अनेक तरुणींनी यामध्ये सहभाग घेतला होता. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी अशा प्रकारची विठ्ठलाची गाणी गात जात होती.
अहिल्यानगर - सोलापूर हायवे वरील चापडगाव या ठिकाणी नागरिकांनी दिंडी मधील वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यांना राहण्याची सोय, जेवणाची सोय, चहा अशा सर्व बाबींची उत्तम प्रकारे सोय केली होती.