श्री क्षेत्र चोंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना
प्रतिनिधी ३० जून (अहिल्यानगर) :- जामखेड तालुक्यातील चोंडी येथून श्री क्षेत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पायी दिंडी आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. या दिंडीमध्ये गावातील अनेक वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. विठ्ठल विठ्ठल जय हरी, पांडुरंगा पांडुरंगा अशा गीतांनी सर्व वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे.