एका गुप्त खेळाची चित्तरकथा : अजित डोवाल
बचावात्मक आक्रमण म्हणजेच दहशतवाद्यांचा उगम जेथे होतो, तेथेच त्यांना नेस्तनाबूत करायला हवे, असा सिद्धांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडला होता. उरी हल्ल्यानंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक असो, की पुलावामा हल्ल्याला भारताने दिलेले उत्तर, हे डोवाल यांच्या सिद्धांताचे यश दिसते. डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले होते, मिझोराममध्ये मिझो बंडखोरांमध्येच फूट पाडली होती. सुवर्णमंदिरावर झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळी बेट खलिस्तानवादी दहशतवाद्यांमध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट म्हणून ते राहिले होते. यामुळेच रक्ताचा एकही थेंब न सांडता सुरक्षा दलांना ही कारवाई पूर्ण करता आली. चीनबरोबरच्या डोकलाम वादात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या रणनीतीमुळेच भारताचा दबदबा निर्माण झाला. हेरगिरी ते मुत्सद्देगिरीच्या प्रवासात अजित डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.