logo

एनटीसी ३३ केव्हीं उपकेंद्रातील पावर ट्रान्सफॉर्मेर क्षमते मध्ये वाढ...

ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडीत वीजपुरवठा सुरू...

नांदेड दि. २९ जून : महावितरण नांदेड परिमंडळ अंतर्गत नांदेड शहर-१ उपविभागातील एनटीसी ३३/११ के.व्हि. उपकेंद्रावरील ग्राहकांना योग्य दाबाने, अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY) योजने अंतर्गत अतिभारीत (ओव्हर लोडेड) असलेले पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ५ MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर ची क्षमतावाढ करून १० MVA करण्यात आली ज्यामुळे एनटीसी उपकेंद्र परिसरातील विपश्यना केंद्र, नांदेड महानगरपालिकेचा कोटीतीर्थ येथील पंप हाऊस, खडकपुरा, दुलेशाह रहमान नगर, समीरा बाग, जीएम कॉलनी, मामा येवले नगर, असलम नगर, असलम ग्राउंड, खडकपुरा चाळ व सैलाब नगर भागातील जवळपास १३०० ग्राहकांना आता योग्य दाबाने वीज पुरवठा होत आहे.... मुख्य अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा निधी गौतम यांच्या देखरेखीत पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वीत कऱण्यात आला त्यावेळी कार्यकारी अभियंता शहर विभाग विनय घनबहाद्दूर व सहाय्यक अभियंता विनोद जाधव, सहाय्यक अभियंता (पा.आ.) नागेश खिल्लारे व इतर कर्मचारी उपस्थित होते....
या बदल एनटीसी परिसरातील वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत असल्यामुळे ग्राहकांकडून महावितरणच्या MSKVY 2.0 योजने बद्दल समाधान व्यक्त होत आहे...

0
0 views