
जन्मदात्या आई-बापानेच घोटला लेकाचा गळा, जावयानेही केली मदत, धक्कादायक कारण समोर
Nashik Crime: सकाळी अकरा वाजता विशालने
जन्मदात्या आई-बापानेच घोटला लेकाचा गळा, जावयानेही केली मदत, धक्कादायक कारण समोर
Nashik Crime: सकाळी अकरा वाजता विशालने पत्नी पूजा हिला सवयीप्रमाणे नोकरीसाठी खासगी कंपनीत सोडले. पत्नी कंपनीत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास विशाल दारू पिऊन घरी आला नाशिक: हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा आईवडिलांनी केला होता. मात्र, शवविच्छेदनात खुनाचे बिंग फुटले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी मृताच्या आईवडिलांसह दाजीविरुद्ध गुन्हा नोंदवला. विशाल गोकुळ पाटील (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशालची पत्नी पूजा (३४) हिने गंगापूर पोलिसांत संशयित सासरा गोकुळ पाटील, सासू शशिकला व जावई उमेश काळे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपासून गणपती गार्डनजवळील परिसरात पाटील कुटुंब वास्तव्यास असून त्यांना मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे आहेत. त्यांचा मुलगा विशाल काही वर्षांपासून अति मद्यसेवन करीत होता. कोणत्याही कारणातून तो आईवडिलांसह पत्नीला मारहाण करून परिसरात गोंधळ घालायचा. या प्रकरणाला त्रासलेल्या आईवडिलांनी जावयाच्या मदतीने त्याची हत्या केली.