logo

अभिनंदन तर झालेच पाहिजे!







MHT-CET 2025 परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत नुकताच जाहीर करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) गटातून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये पाडळी (ता. कराड, जि. सातारा) गावचा सुपुत्र आफान इम्रान पठाण याने आपल्या अफाट मेहनतीच्या जोरावर 99.87 गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे आफानने लिगडे पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. आफानच्या या यशाबद्दल परिसरात उत्सवाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

📚 मेहनत, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांचा हा उत्तम नमुना म्हणजे आफान पठाण!
💐 आफान याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा!


5
185 views