logo

नग्न फोटो काढले भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले..



बीड : शहरातील उमाकिरण खासगी क्लासेसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीला बॅड टच करत तिचे नग्न करून फोटो काढले. हा त्रास असह्य झाल्याने पीडिता मागील १५ दिवसांपासून जेवलीही नाही. रात्रीच्या वेळी अचानक दचकून जागी व्हायची. हा प्रकार पाहून आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतरे केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. यामुळे पीडिता तणावाखाली होती. हे पाहून पालक अभ्यासाचा ताण असेल या हेतूने विजय पवार याच्याकडे विचारण्यास गेल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी मुलीलाच विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर तिने हे सर्व वास्तव सांगितले

आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच क्लासेसजवळ गुन्हा दाखल होताच बंदोबस्त तैनात केला.

किशोर पवार, पोलिस निरीक्षक, बीड

24
990 views