logo

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन जीव घेणा हल्ला करणा-या आरोपीस शेवगाव पोलीसांनी केली तात्काळ अटक

शेवगांव:-शेवगांव येथील पिडीतेच्या फिर्यादीवरुन दिनांक २७/०६/२०२५ रोजी सायंकाळी १६-०० वाचे सुमारास यातील पिडीत हीने पांढरे रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट व गळयामध्ये भगव्या रंगाचा रुमाल परिधान करुन तिचे मुस्लीम धर्मीय काळया रंगाचा बुरखा परिधान केलेल्या मैत्रिणी सोबत मोटार सायकल वरुन कुंभारगल्ली शेवगाव येथुन जात असताना यातील आरोपी नामे १) सलाउददीन हाशमोदिन शेख रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव ता. शेवगाव २) गुलाम गौषकुरेशी रा खाटीकगल्ली, शेवगाव ता. शेवगाव असे स्कुटी मोटार सायकलवर येऊन पिडीत ही चालवित असलेल्या मो सा गाडी आडवी लावुन यातील पिडीत ही हिंदु मुलगा असल्याचे समजुन तो मुस्लीम धर्मीय मुलीस मोटार सायकल वरुन घेऊन जात असल्याचे संशयावरुन पिडीतेचा वाईट उददेशाने हात पकडुन आरोपी क्र.१ याने त्यांचे जवळ असलेल्या चाकुने पिडीतेस जिवे ठार मारण्याचे उददेशाने तीचे गळयावर वार केला असता पिडीतेने डावा हात मध्ये घातल्याने पिडीतेचे डावे हाताचे दंडावर गंभीर दुखापत झाली आहे. वगैरे मजकुरचे हकिगत वरुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र. नं ५६९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९,७४,१२६ (२), ३(५) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण व प्रतिबंद अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे सलाउददीन हाशमोदिन शेख रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव ता. शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता. मा. पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकूळे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे सलाउददीन हाशमोदिन शेख हा शेवगाव शहरातील भारदे हायस्कुल चे परीसरात लपुन बसला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकूळे यांनी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. सदर आरोपो हा नमुद ठिकाणीहुन पळुन जात असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन पुढिल कायदेशीर कारवाई करत आहोत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री संतोष मुटकुळे सो, सपोनि/सुदंरडे, पोसई/प्रविण महाले, पोहेकों/अदिनाथ खेडकर, पोकों भगवान सानप, पोकॉ/शाम गुंजाळ, पोकों/देविदास तांदळे, पोकों राहुल आठरे, पोकों/अदिनाथ शिरसाठ, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकों/अस्लम शेख, पोकों भारत अंगरखे, पोकों दादासाहेब खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरील गुन्ह्यांचा तपास सपोनि/श्री धरमसिंग सुदंरडे हे करत आहेत.

614
12135 views