logo

शेतकर्‍यांची अवहेलना करणार्‍या भाजप आमदार बबन लोणीकर चा पुतळा दहन करून निषेध करण्यात आला.

शेतकर्‍यांची अवहेलना करणार्‍या भाजप आमदार बबन लोणीकर चा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आले तसेच जोरदारपणे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता तर केलीच नाही परंतु त्यांच्या सरकार मधील आमदार बेताल वक्तव्य करत शेतकर्‍यांचा व त्यांच्या परीवाराची अवहेलना करण्यासह अपमान करत आहे तरी त्यांच्यावर शेतकर्‍यां बद्दल आव आणणारे महायुती सरकार मधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मात्र मूग गिळून चूप आहे अश्या आमदाराचा जाहीर निषेधासह पुतळा दहन करण्यात आला.या महायुती सरकारला व भाजप ला आता सत्तेचा माज आला असून शेतकरी राजाला हीन लेखण्याच काम करत आहे.म्हणून बबन लोणीकर सारख्या औलादिला लाज वाटायला पाहिजे आणि याने तात्काळ जनतेची माफी मागायला पाहिजे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारची अंत्ययात्रा काढावी लागेल असा इशारा जळगांव लोकसभेचे जिल्हाप्रमुख श्री.कुलभूषण पाटील यांनी दिला आहे.
बेताल वक्तव्य करणाऱ्या बबन लोणीकर या आमदार चा शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील,उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे,तालुकाप्रमुख उमेश पाटील,युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी,माजी शहर संघटक प्रमुख राजूभाऊ पाटील, महिला महानगर प्रमुख मनीषाताई पाटील, विभाग प्रमुख विजय बांदल,विजय राठोड, जितेंद्र बारी, रुपेश पाटील, भैय्या वाघ,किरण ठाकूर,सचिन चौधरी बापू मोणे,सतीश मोरे,दीपक पवार, मयूर गवळी,अंकीत कासार,अनिल गवळी यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

2
13 views