शिरसोली प्र बो ता. जळगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी नितीन बुंदे यांची बिनविरोध निवड
*
आज 27 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत शिरसोली प्र बो तालुका जिल्हा जळगाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच पदाची निवडणूक असल्याने 4 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच पदासाठी आपले उमेदवारी अर्ज भरले परंतु माघारीच्या वेळेला 3 जणांची माघार होऊन नितीन बुंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती राधिका दुर्गुडे यांनी जाहीर केले. निवडणुकीकामी ग्रामसेवक पाटे भाऊसाहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. एमआयडीसी जळगाव पोलीस स्टेशनचे फौजदार उगले साहेब कॉन्स्टेबल किरण चौधरी पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. ग्रामपंचायत सरपंच निवडणूक झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच नितीन भाऊ बुंदे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.