logo

सटवा माता मंदिर रोड-दोन वर्ष आधी सिमेंट रोड बनला असता एका पावसाळ्यात दुर्मिळ हालात.

सावनेर- नगरपरिषदेच्या माध्यमातून बस स्टॉप ते आंबेडकर संकुल समोरील सटवा माता मंदिर रोड बनलेल्या रोडमध्ये घोटाळा झाल्याचे नागरिकांचे आरोप
काल पासून सतत पाउस सुरु झाल्या पासुन आंबेडकर संकुल सर्व दुकानदार रोडवरील पाणी साचल्याने दुकानात पाणी येण्याची व दुकानातील माल खराब होणार या मुळे परेशान होताना दिसत आहे.दर वर्षी नगरपरिषद आंबेडकर संकुल समोरील रोड नाली पाणी हीच अवस्था असते व नगरपरिषद यांना वारंवार सुचना देउन सुद्धा तरी पण नगरपरिषद यांनी कुठलेही तिथल्या आंबेडकर संकुल समोरील रोडवरील,पाणी निघण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही. नाली आहे पण ते बेकामी आहे असे तिथले दुकानदार बोलताना दिसत आहे.जास्त प्रमाणात आणि अशाच पद्धतीने सतत पाणी चालू असल्यास दुकानांमध्ये पाणी जात असते व आमच्या दुकानातला माल खराब होत असते या उद्देशाने आंबेडकर संकुल येथील दुकानदार माल खराब होण्याची आता जबाबदारी कोण घेणार ही तिथल्या नागरिकांनी दुकानदारांनी वर्तवलेले आहे.
वारंवार नगरपरिषद ला सांगून सुद्धा कोणत्याही पद्धतीचे इथे काम होताना दिसत नाही व दुकानाचा किराया दहा परसेंटेज दरवर्षी वाढ होते पण कोणतेही दुकानात समोरील रोड व नालीचे काम होताना दिसत नाही असे नागरिकांचे नगरपरिषद बांधकाम विभाग यांच्यावर आरोप केला आहे .तरी नगरपरिषद मुख्य अधिकारी यांनी या सबंधी लवकरात लवकर रोडवरील पाण्याची व नालीची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही आंबेडकर संकुलचे सर्व दुकानदार मिळून आंदोलन करू व टॅक्स न देण्याचा निर्णय घेऊ असे यावेळी दुकानदार कडुन इशाराही देण्यात आला.

7
4293 views