
राज ठाकरे उद्धव ठाकरे सहा तार
राज ठाकरे उद्धव ठाकरे ६ जुलै बंधू एकत्र येणार मोर्चा साठी मराठी साठी
बंधू
Raj Thackeray On Uddhav Thackeray: आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार; राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Raj Thackeray On Uddhav Thackeray: आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार; राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Raj Thackeray On Uddhav Thackeray: मुंबईत 6 जुलै रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आव्हान राज ठाकरेंनी क
Raj Thackeray said we will talk to Uddhav Thackeray for marathi morcha of mumbai shivsena mns yuti maharashtra politics Raj Thackeray On Uddhav Thackeray: आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Uddhav Thackeray-Raj Thackeray
Raj Thackeray On Uddhav Thackeray मुंबई: राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्तीच्या संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचपार्श्वभूमीवर 6 जुलै रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत देखील आमची माणसं बोलतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी
हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, असं राज ठाकरेंनी सांगितले.
मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई
आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार; राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?
मांजर आडवी गेली की अशुभ? काय आहे या अंधश्रद्धेचं सत्य? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं...
गोपाळ परतल्यानं इंदू-अधूच्या संसारात मिठाचा खडा पडणार? दोघेही नात्यांची कसोटी पार करणार? PHOTOs
हाऊसफुल्ल! विराट-रोहितसाठी मैदान 4 महिने आधीच भरलं, भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यांची तिकिटं SOLD OUT
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच बनतोय जबरदस्त राजयोग, 'या' 5 राशी ठरणार भाग्यशाली, नोकरी, करिअर, पैसा जोरात!
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
6 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाने यावं. मोर्चात कोणत्याही पार्टीचा झेंडा नसेल. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणसाकडे असेल. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघणार आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. मोर्चात सर्व साहित्यिक,तज्ज्ञांनी सहभागी व्हावे. मोर्चात विद्यार्थी आणि शिक्षकांनी यावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. सर्वांना सहभागी व्हावं म्हणून रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच मोर्चाला कोण येणार नाही ते पाहणार, असं राज ठाकरे म्हणाले. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र
ाचं मराठीपण घालवायचा हा कट- राज ठाकरे
हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल, मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, अशी घोषणाच राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतोय कारण हा कटच आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,
Dada Bhuse Meets Raj Thackeray: मला मान्य नाही...; हिंदी भाषा सक्तीवरुन दादा भुसे सरकारची भूमिका मांडायला गेले, राज ठाकरे काय काय म्हणाले