logo

आणीबाणीचा काळात तुरुंगवास सहन करारे सेनानी चा सत्कार....!

आणीबाणीचा काळात तुरुंगवास सहन करारे सेनानी चा सत्कार करण्यात आला .
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
२५ जुन २०२५

आणीबाणीचा काळा दिवस,५० वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने संपूर्ण देशात आणीबाणी घोषित करून संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले, याविरोधात प्रचंड जनआंदोलन उभे राहिले यात अनेकांना तुरुंगवास सहन करावा लागला अशा सर्व मिसाबंधू व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सोहळा भाजपा जामनेर पश्चिम मंडलाच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पतसंस्था सभागृह शेंदुर्णी येथे संपन्न झाला, यावेळी मिसाबंधु व जेष्ठ नेते गोविंद काका अग्रवाल यांनी तुरुंगातील त्यावेळचे त्यांचे एकूण अनुभव कथन केले,
यावेळी जेष्ठ नेते संजय दादा गरुड, मिसाबंधू प्रकाश झंवर, उत्तम बारी,मा.संरपच कमलाकर पाटील यांचे सह इतर मिसाबंधु यांचे नातलग, अमृत बापू खलसे, डॉ किरण सूर्यवंशी, निलेश थोरात, डॉ पंकज सूर्यवंशी, गटप्रमुख सुभाष पाटील, हर्षल चौधरी , विविध संस्थांचे पदाधिकारी, शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

0
25 views