logo

वनहक्क दावेदारांवर झालेल्या अन्याया बाबत भूमी हक्क परिषद चे निवेदन!!

वनहक्क दावेदारांवर झालेल्या अन्याया बाबत भूमी हक्क परिषद चे निवेदन.
संघटनेच्या वतीने 14 जुलै रोजी
करण्यात येणार अन्नत्याग आंदोलन

बुलढाणा मन्सूर शहा.AIMAMEDIA- जिल्हास्तरीय वनहक्क समिती च्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय समिती चा सदस्यीय कोरम हा पुर्ण नसतांना पुनर्विलोकन अपिल प्रकरणे नामंजूर करून वनहक्क अपिलार्थी यांच्या वर वन व महसूल प्रशासनाने अन्याय केला आहे.त्यांना वन व महसूल प्रशासना कडून न्याय मिळावा. व अन्य मागण्यांसाठी आज सोमवार दिनांक 23 जुन 2024 रोजी संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांच्या सह जिल्ह्यातील शेकडो वन हक्क दावेदाराच्या उपस्थिती भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी बुलढाणा तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे. की, दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय समिती चा सदस्यीय कोरम हा पुर्ण नसतांना पुनर्विलोकन अपिल प्रकरणे नामंजूर करून वनहक्क अपिलार्थी यांच्या वर वन व महसूल प्रशासनाने अन्याय केला आहे.त्यांना न्याय मिळावा. तसेच जिल्हास्तरीय वनहक्क समिती बरखास्त असतांना तसेच कोरम पुर्ण नसतांना त्रिसदस्यीय समितीस वनहक्क कायदया नुसार कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार नसतांना दिनांक 4 सटेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयाचा फेर विचार करण्यात यावा.
पुनर्विलोकनामध्ये वनहक्क अपिल प्रकरणात नामंजुर झालेल्या अपिलार्थांना मंत्रालय स्तरावर अपिल प्रकरणे दाखल केलेली असून त्यामध्ये मौजे तारापूर ता. जि. बुलढाणा येथील ११, मौजे खैरखेड ता.मोताळा जि. बुलढाणा येथील २९ माळेगाव येथील २६ इत्यादी अपिलार्थी यांनी जिल्हास्तरीय समितीच्या निर्णया विरुध्द मंत्रालय स्तरावर अपिल प्रकरणे दाखल केली आहेत या अपिलांचा अंतिम निर्णय लागेपर्यंत अपिलार्थी यांच्या ताब्यात असलेल्या वनजमीनीत मशागत करण्याबाबत अडवणूक करण्यात येवु नये याबाबत वनविभागास आदेशीत करण्यात यावे ही विनंती. यांच्या सह अन्य मागण्याच्या समावेश निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, प्रदेश अध्यक्ष राजेश गायकवाड, जिल्हाअध्यक्ष मुशीर खान, संघटनेचे पदाधिकारी शिवदास घोती, जाकीर शाह, भास्कर धुरंधर, ठाकुरसिंग नोळे यांच्या सह जिल्ह्यातील शेकडो वन हक्क दावेदार उपस्थित होते.

6
1247 views