logo

चिंचवन, वडवणी (जि. बीड) – पोस्ट कर्मचाऱ्याचा उद्धटपणा नागरिकाला दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या

---

चिंचवन, वडवणी (जि. बीड) – पोस्ट कर्मचाऱ्याचा उद्धटपणा नागरिकाला दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या

चिंचवन (ता. वडवणी, जि. बीड) येथील डागर पोस्ट ऑफिसमधील बी .पी .एम .(Branch Post Master) प्रज्ञा मुंडे यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामस्थ अंगद बडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दिनांक ४ जून २०२५ रोजी गावात झालेल्या ग्रामसभेमध्ये अनेक नागरिकांनी चिंचवन पोस्ट ऑफिसविषयी तक्रारी मांडल्या. त्यावर अधिक माहिती घेण्यासाठी अंगद बडे यांनी प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसला भेट दिली. त्यावेळी कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. परत येताना गावकऱ्यांशी संवाद साधत असताना समजले की, काही दिवसांपासून पोस्ट ऑफिस सतत बंद राहत आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे पेंशन, पीएम किसान योजना, नवीन खाती उघडणे, मुख्यमंत्री लाडली बहिण योजना यासाठी लागणाऱ्या व्यवहारांना अडथळे येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

या पार्श्वभूमीवर बडे यांनी प्रज्ञा मुंडे यांच्याशी कार्यालय बंद राहण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अर्वाच्य भाषा वापरली. यानंतर मुंडे यांनी त्यांच्या महिला नातेवाईकांना बडे यांचा मोबाईल नंबर (९४०५१०३४७२) देत त्यांना धमकावण्यास सांगितले. संबंधित नातेवाईक महिलेने ७८८८९११२१२ या क्रमांकावरून बडे यांना फोन करून, "तुझ्या गावात येऊन तुला बघते, तू काय मोठा झाला आहेस का? तुला मारून टाकते," अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्या.

या प्रकारामुळे अंबादास बडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांना जीवित आणि सामाजिक असुरक्षिततेची भीती वाटत आहे. या संपूर्ण घटनेत बीपीएम प्रज्ञा मुंडे यांनीच त्यांच्या नातेवाईकांमार्फत हे घडवून आणल्याचा आरोप बडे यांनी केला आहे.

या प्रकरणी बडे यांनी संबंधित डाक विभाग प्रमुखांकडे तातडीने तक्रार नोंदवून, बीपीएम प्रज्ञा मुंडे यांच्यावर निलंबन व चौकशीसह कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन,
राष्ट्रीय युवा शक्ती संघाचे,
राष्ट्रीय अध्यक्ष, Prof श्री शिवाजी सर कोठुळे यांनी
तत्काळ ऑनलाइन तक्रार केली आहे ,

35
10049 views