logo

विकासाला गवसणी घलणारा..पाडुरंग..!!


बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जकात विभागात त्यावेळी आंम्ही कार्यरत होतो. पांडुरंग जाधव हे आमच्या सोबत कर्तव्यावर होते. १७ जून २०१७ केंद्राच्या एक देश एक कर अर्थात " वस्तू सेवा कर " ( GST ) कर प्रणाली अस्तित्वात आल्यामुळे जकात कर बंद झाला. जाधवांपुढे आता पुढे काय..?? हा यक्ष प्रश्न आवासून उभा होता. अशा प्रतिकुल परिस्थितीशी त्यांनी दोन हात करुन नरिमन पाॅईन्टच्या मल्होत्रा हाऊस येथील व्यवसायिक सहकारी संस्थेत आमचे परमस्नेही श्री मधू पाटील यांच्या सहकार्याने व्यवस्थापक झाले. मुळात शिकण्याची आवड असणार्या जाधवांनी नोकरी सांभाळून कला शाखेची पदवी मिळवली नंतर ते एम्बीए आणि काही महिन्यांपूर्वीच कायदेतज्ञ अर्थात वकील झाले. त्यांचा प्रतिकुल परिस्थीवर मात करून यशस्वीता मिळविलेला हा प्रवास नूसताच थक्क करणारा नसून अतिशय प्रेरणादायी असाच आहे. आपल्या या यशाबद्दल आंम्ही आपले अभिमानाने मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करुन आपल्या भविष्यातील उज्वल यशासाठी सदिच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद..!!

28
2130 views