logo

भुसावळ रेल्वे ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य उत्साहात साजरा....!

भुसावळ रेल्वे ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य उत्साहात साजरा करण्यात आला.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):- २२जुन २०२५
भुसावळ येथील रेल्वे ग्राउंडवर भव्य प्रमाणात १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. गिरीश महाजन (मंत्री, सिंचन, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा, महाराष्ट्र राज्य), मा. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री, युवा कल्याण आणि क्रीडा), आणि मा. संजय सावकारे (मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य) जळगाव जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

🌿 या कार्यक्रमाचे आयोजन :

भारतीय खेल प्राधिकरण, भारत सरकार यांच्या पुढाकाराने, आणि मध्य रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वर्षीचा थीम : "Yoga for One Earth, One Health"
योग हे निसर्गाशी सुसंवाद साधत एकात्मतेकडे नेणारे साधन आहे.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरीक, स्वयंसेवी संस्था आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

4
142 views