
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संयोग व योग संगम कार्यक्रम उत्साहात संपन्न.
*सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संयोग व योग संगम कार्यक्रम संपन्न*( बालाजी पडोळे )विशेष प्रतिनिधी शिरूर ताजबंद अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे दि.२१ जून २०२५ शनिवारी ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सी.सी.आर.वाय.एन. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने संयोग व योग संगम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नामदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सौ.मंजुषा लटपटे; चाकूरचे तहसीलदार एन. बी. जाधव,शिक्षणाधिकारी ढोकाडे बबनराव केंद्रप्रमुख कासार शफि्योद्दीन,माजी नायब तहसीलदार ओम सोनी,सरपंच मच्छिंद्र वाघमारे,उपसरपंच सूरजभैय्या बाबासाहेब पाटील, स्विय सहाय्यक कोंडीबा पडोळे माजी नगरसेवक ॲड. निखिल कासनाळे, विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी सामान्य योग अभ्यासक्रम, विशेष योग सत्र व व्याख्याने,चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आशा योग नॅचरोपॅथी अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास स्वामी विवेकानंद विद्यालय व आय. एन. ओ. सूर्या फाउंडेशन यांनी सहकार्य केले. योग साधक राजुर वरवाळ चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगप्रशिक्षक योगरत्न डॉ. मेजर मधुसूदन चेरेकर यांनी योगाचे धडे उपस्थितांना दिले. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये डॉ.चेरेकर यांनी पारंपारिक औषधी पद्धती आयुर्वेद, सिद्ध,युनानी,होमिओपॅथी आणि सोवा रीग्पा या प्रमाणेच योग सुद्धा पारंपारिक उपचार पद्धती आहे याबद्दल माहीती दिली,त्यानंतर डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत यांनी विविध विकारामध्ये योगामुळे होणारे लाभ यावर माहीती दिली .योगाचार्य शिवमुर्ती भांतांब्रे यांनी सामाजिक व पारिवारिक शांतीसाठी योग वर माहीती दिली, डॉ.सौ. मीरा गोदेपुरे यांनी गर्भसंस्कार तर सौ. प्रेमा वतनी यांनी महिलांच्या आरोग्यावर योगामुळे होणारा लाभ यावर मार्गदर्शन केले, तर या कार्यक्रमाच्यि यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिपक भराटे,सौ. सुमन पवार,(पतंजली जिल्हा महिला प्रभारी,)मुख्याध्यापक केशव मुंडकर, धनेश गोलावार, विशाल डुब्बेवार, सूर्यकांत मोरे,डॉ. ऋतुजा वाघमारे, चैतन्य वाघमारे, डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत, अरविंद कांडनगिरे, राजकुमार बलदवा व शिक्षक, कर्मचारी शेकडो लाभार्थी,नागरीकउपस्थित होते .