logo

जनता विद्यालयात आंतराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

बातमी

जनता विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

पिंपळगाव सराई | २१ जून २०२५

पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी अविनाश मानकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात गजानन पाटोळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी सुदाम चंद्रे यांनी कुशलतेने पार पाडली. योग मार्गदर्शनासाठी विशेष आमंत्रित अविनाश असोलकर यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना योगासनांचे सादरीकरण करून योगाचे शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले.

या वेळी शाळा समिती सदस्य सदाशिव आप्पा शिंदे, विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे, विठ्ठल सोनवणे, शेख निजामुद्दीन, समाधान खंडारे, सचिन शिंदे यांच्यासह गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, "प्रत्येक दिवस योगासोबत सुरू करा आणि तुमचं जीवन आरोग्यमय, आनंदमय आणि उज्ज्वल बनवा." त्यांनी योगाच्या सातत्यपूर्ण सरावामुळे मिळणाऱ्या मानसिक व शारीरिक लाभांवर भर दिला.आज योग दिनाच्या निमित्ताने शाळेत इको क्लब च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. योग दिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात निर्माण झालेले सकारात्मक वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आरोग्यजागृती आणि सहभागाची ऊर्जा यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

49
2599 views