logo

विध्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला केले जेरबंद.

ढाणकी : जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक याने

आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आल्पवीन विथ्यार्थिनी ला शिकवण्या बहाण्याने विनयभंग केला होता विध्यार्थिनीने आपल्या सोबत शिक्षकाने केलेले कृत्य घरी आल्यावर आपल्या पालकाला सांगितले. दुसऱ्या दिवशी पालक आपल्या पाल्याला घेऊन शाळेत जाऊन आपल्या मुलीशी केलेल्या कृत्याची विचारणा करण्यास गेले आसता तो शिक्षक शाळेत आला नव्हता. आल्पवीन मुलीची त्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने शिकवण्याच्या बहन्याने नको तिथे स्पर्श केल्याची वार्ता इतर पालकाला कळताच मोठ्या प्रमाणात गावकरी शाळेत जमा झाले व शिक्षकाला निलंबीत करून अटक करण्याची मागणी केली जाऊ लागली. जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थिनीच्या तक्रारी पीडित वरुण त्या शिक्षकाला निलंबीत निलंबीत करण्यात आले आल्पवीन विध्यार्थिनीच्या तक्रारी वरुण शेख जमीर शेख नजीर रा. उमरखेड या शिक्षकांवर बिटरगाव पोलीस स्टेशन आंतर्गत 244/25 कलम 75 (1) भारतीय न्याय संहिता सह कलम 8,12 पोकसो आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासून काल पर्यंत हा शिक्षक फरार होता. दि. 18/06/2025 रोजी पुसद कोर्ट येथे हजर होण्या करिता आल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास पुसद कोर्ट येथून ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्हामध्ये अटक करण्यात आली आहे सदर ची कार्यवाही मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. पीयूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा याचे मागदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे पोहेका रवी गिते, प्रवीण जाधव यांनी केली पुढील तपास psi सागर अन्नमावर हे करित आहेत.

19
964 views