logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भिगवणचे प्रसिद्ध उद्योगपती तुषार धुमाळ यांचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भिगवणचे प्रसिद्ध उद्योगपती तुषार धुमाळ यांचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी

माळशिरस- अकलूज येथील प्रसिद्ध सयाजी राजे पार्कमध्ये मित्रांसह पर्यटनासाठी आलेले भिगवणचे उद्योगपती तुषार धुमाळ यांचा मृत्यू झाला. ते ज्या पाळण्यात बसले होते, तो पाळणा हवेतच तुटून तिघेही उंचावरून खाली पडले. या दुर्घटनेत धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

पावसाळ्यात वॉटर पार्कला आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्यात पावसाला सुरुवात होताच भिगवणपासून जवळ असणाऱ्या अकलूजच्या वॉटर पार्कला उद्योजक धुमाळ आणि त्यांच्या तीन मित्रांनी जाण्याचे नियोजन केले. वॉटर पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तुषार धुमाळ हे त्यांच्या दोन मित्रांसह सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरायला आले होते. तिघे मित्र राईडमध्ये बसले, पण राईडचा वेग वाढल्यानंतर अचानक पाळणा खाली कोसळला. राईडचा वेग जास्त असल्यामुळे पाळणाही त्याच वेगामध्ये खाली पडला आणि तुषार धुमाळ यांना गंभीर दुखापत झाली. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातल्या एकाची मान फॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. फिरता पाळणा खूप उंचावरून पडल्यामुळे धुमाळ गतप्राण होऊन पडले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

175
3713 views
1 shares

Comment