logo

जिल्हा परिषद शाळा झारगडवाडी पहिला दिवस; विद्यार्थ्यांचे असे करण्यात आले जोरदार स्वागत...

जिल्हा परिषद शाळांना आजपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश वितरित करण्यात आले.
बारामती-(झारगडवाडी ): दि.16-
तब्बल दोन महिन्यांच्या सुट्यानंतर आजपासून जिल्हा परिषद शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहूर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, जिल्हा परिषद शाळा झारगडवाडी शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
*यांची होती उपस्थिती*
प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा झारगडवाडी येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात बिचकुले साहेब मा.गटविकास अधिकारी सोलापूर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक जाधव,लडकत सर,गुरव मॅडम,नाळे मॅडम,लडकत मॅडम,लाटे सर, ग्रामस्थ उपस्थित होते.

109
2071 views