मोठ्या उत्साहात नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हा परिषद शाळा आंबे या शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या आनंदाने वाजत गाजत मिरवणुकींनी त्यांचे स्वागत करण्यात आले २०२५-२६ या नवीन वर्षाच्या निमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली या वर्गामध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत व सत्कार करण्यात आला शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून ट्रॅक्टर मधून लहान मुलांचे फेरी काढण्यात आले व शिक्षणाबद्दल पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांना पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी तंटामुक्तीसमितीचे अध्यक्ष सगन शेख चंद्रभागासहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णा मामा शिंदे जिल्हा ग्रंथालय संघाचे सह सचिवअन्सार शेखआंबे ग्रामपंचायतचे नूतन डेप्युटी सरपंच श्रीरंग कोळी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे पंढरपूर मार्केट कमिटीचे माझे सदस्य हिरालाल शेख माजी सरपंच अर्जुन कोळी आंबे सोसायटीचे चेअरमन विलास घोडके चेअरमन राजाराम गायकवाड जिल्हा परिषद शाळा आंबे मुख्याध्यापिका व त्यांचे सर्व शिक्षक हजर होते शाळेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीसाठी मदत करण्याचे सर्व मान्यवरांनी मान्य केले