logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जांभूळ येथे उत्साहात पार

कल्याण ग्रामीण - प्रतिनिधी
जोगेंद्र जाधव

कल्याण : दि. १३ जून २०२५ रोजी कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, जांभूळ येथे मैत्री फाऊंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या आणि बारावीतील ६० टक्क्‌यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ठेवण्यासाठी फाईल फोल्डर आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला करिअर मार्गदर्शक राजेश्वर दाभाडे, श्री साईकृपा विद्यालयाचे सेवानिवृत्त
मुख्याध्यापक साहे बराव महाजन सर आणि शिक्षक संजय पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रिया राणे यांनी केले तर प्रास्ताविक रुपेश राणे यांनी केले. यावेळी दाभाडे यांनी
विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करत, 'आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा व योग्य निर्णय घेऊन उज्वल भवितव्य घडवा,' असा संदेश दिला. त्यांनी आजवर ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक सावंत, शेखर सावंत, चिंतामण ताम्हाणे, तसेच जगदीश कडव, कमलाकर आयरेकर, हनुमान आयरेकर, एकनाथ साळुंखे आणि प्रशांत सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.

महाजन सरांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रेरणादायी उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत मैत्री फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

126
10398 views

Comment