*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकच्या कामाला लागा.. नितीन बापू देशमुख*
बुलढाणा:खामगाव येथील पत्रकार भवनात शिवसेना ऊबाठा पक्षाचे वतीने दि. १४ जुन शनिवार रोजीआढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थानी नरेंद्र खेडेकर बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख हे होते तर प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शक नितीन बापू देशमुख उपनेते हे होते. प्रमुख उपस्थितीत दत्तात्रय पाटील सहसंपर्क प्रमुख, जालिंदर बुधवत जि. प्र. वसंतराव भोजने जिल्हा प्रमुख, तुकाराम काळपांडे जिल्हा ऊ. प्र, भिमराव पाटील विधानसभा संघटक श्रीराम खेलदार तालुका प्रमुख खामगाव , रविंद्र झाडोकार , गजानन वाघ, हर्षल आखरे तसेच रमेश ताडे शहर प्रमुख हजर होते.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक वसंतराव भोजने यांनी केले तर श्रीराम खेलदार , हर्षल आखरे,दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर,व नितीन बापू देशमुख यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमा ला खामगाव विधानसभा व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ तील पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.