logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गंगापुर तहसिलच्या पुरवठाविभागाच्या नायबतहसिलदार कांचन कांबळे यांना 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

रास्त भाव दुकानाच्या निलंबन प्रस्तावासाठी मागितली लाच रक्कम 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक.

गंगापूर/छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी (एन टी) कांचन नामदेवराव कांबळे (वय 34) यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) छत्रपती संभाजीनगर युनिटच्या पथकाने 14 जून 2025 रोजी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी भवनच्या गेटजवळ/ परिसरात करण्यात आली.

तक्रारदाराचे आजोबा यांच्या नावे मौजे काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथील रास्त भाव दुकान क्र. 29 असून, त्यावर निलंबन प्रस्ताव रद्द करण्यासाठी श्रीमती कांबळे यांनी स्वतःसाठी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी मिळून 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी 12 जून 2025 रोजी ला.प्र.वि. कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर 13 जून रोजी पडताळणी दरम्यान, तक्रारदार व आरोपी यांच्यात गंगापूर तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेत 15,000 रुपये स्वतःसाठी व 25,000 रुपये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी, अशी एकूण 40,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे आरोपीने कबूल केले.

त्याअनुषंगाने 14 जून रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 14,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताच कांबळे यांना महिला पोलिस व पंचासमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली.

कारवाईदरम्यान त्यांच्या अंगझडतीत आयफोन 13 प्रो, एक अतिरिक्त मोबाईल, पर्समधील 3,000 रुपये आणि गाडीच्या डिकीत ठेवलेली 40,000 रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. दोन्ही मोबाईलचे विश्लेषण सुरू असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7 (अ) अंतर्गत गुन्हा वेदांत नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, मुकुंद अघाव, अपर पोलीस अधीक्षक, सुरेश नाईकनवरे, पो.उप.अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी : पो.नि. वाल्मीक कोरे
सहायक सापळा अधिकारी : पो.उप.अधिक्षक गोरखनाथ गांगुर्डे
सापळा पथक – पोह. राजेंद्र जोशी, पो.अं. डोंगर दिवे, सी.एन. बागुल, महिला पोहे. पुष्पा दराडे, अशा कुंटे (ला.प्र.वि., छ. संभाजीनगर) यांनी केली.

192
2052 views

Comment