logo

पुणे, अवसरी बु. येथे महसूल घोडेगाव यांच्या भोंगळ कारभरा मुळे मातंग समाज भूमिहीन होण्याची वेळ, या बेजबाबदार कामा विरुद्ध, अखिल मातंग समाज चळवळ महा. राज्य. च्या वतीने अवसरी बु. तेथे आज अवसरी बु.तलाठी व घोडेगाव महसूल अधिकाऱ्यां विरुद्ध निषेध मातंग समाजाचा मोर्चा आयोजित केला आहे.

सविस्तर बातमीपत्र -
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बु. येथील मातंग समाजाची जमीन 1988 साली डिंबे धरणग्रस्त साठी अवसरी बु. येथील जमीन संपादित केलेल्याचा नकाशा लपवून, 2025 साली त्या संपादित जमिनी चा नवीन नकाशा बनवून जमीन चे मुळ मालक गायकवाड यांना धमकवून अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन सिलिंग न केलेली जमीन बाळकविनयाचा घाट घातला आहे, गाव तलाठी, आंबेगाव तहसीलदार, सर्कल, भूमी अभिलेख अधिकारी या महसूल अधिकाऱ्या च्या बेकायदेशीर कामाविषयीं मातंग समाजाचा निषेध मोर्चा तलाठी कार्यालय, अवसरी बु. या ठिकाणी नियोजित केला आहे. या मोर्चा ला जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अनेक संघटनानी पाठिंबा दिला असून या निषेध मोर्चा त सामील होणार आहे.
बातमीदार -
काळुराम राजगुरू, पुणे.
मोबाईल - 9604525101

28
2955 views