logo

रिसोड पंचायत समिती राम भरोसे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

रिसोड :- शासनाच्या विविध योजना ह्या पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जात असून रिसोड येथील पंचायत समिती मध्ये अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र आढळून आणले आहे तर कृषी विभाग ला कुलूप लागली होती तर सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी हजर नव्हते भंडारी विभागाला कुलूप शासकीय खुर्च्या ह्या आवारामध्ये पडल्याचे चित्रही दिसून आले तसेच फक्त समोरून रंगरंगोटी केली असून अस्वच्छतेचा अभाव दिसून आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये हजर राहणे हे बंधनकारक असताना त्या ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून आले आहे घरकुल योजना असो की विहिरीची योजना असो अशा अनेक योजना या कार्यालयामार्फत राबवल्या जात असून सदर कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी देखील कर्मचारी हजर नसल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचा हम बोले तो कायदा चे चित्र दिसून आले आहे यापुढे कर्मचाऱ्यावर वचक ठेवली जाईल का? हा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे शासकीय कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त चक्रात माराव्या जेणेकरून आम्ही मनो तेव्हा तुमच्या फाईलवर सही करू असे चित्र दिसत आहे

29
3911 views