logo

SHAIKH ASIF SHAIKH YUSUF AIMA news BULDHANA MAHARASHTRA

चिखली:-

चिखली शहरात आज 'वाहन बाजार' या भव्य शोरूमचे थाटामाटात उद्घाटन झाले. शहरातील वाहनप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे, जिथे विविध प्रकारची नवीन आणि जुनी वाहने एकाच छताखाली उपलब्ध असतील.

उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते तर स्थानिक आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते फिट कापून उद्घाटन करण्यात आले, उपस्थितात नगरसेवक, प्रसिद्ध व्यावसायिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. 'वाहन बाजार' च्या संस्थापकांनी सांगितले की, ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची जुनी वाहने आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. येथे ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार दुचाकी, चारचाकी, तसेच व्यावसायिक वाहनांचे विस्तृत पर्याय उपलब्ध असतील.

या शोरूममध्ये वाहनांच्या खरेदी-विक्रीसोबतच फायनान्स, इन्शुरन्स आणि सर्व्हिसिंगची सुविधा देखील पुरवली जाईल. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक सेवा मिळतील, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. 'वाहन बाजार' हे केवळ वाहनांचे केंद्र नसून, ग्राहकांना एक अनोखा खरेदी अनुभव देणारे ठिकाण बनवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

या उद्घाटन समारंभाने शहरातील वाहन उद्योगात एक नवीन ऊर्जा आणली असून, ग्राहकांना चांगल्या आणि विश्वसनीय पर्यायांची अपेक्षा चिखली शहरात ही उपलब्ध झाली असून याचा लाभ घ्या असे आवाहन MH 28 वाहन बाजार चे संचालकांनी केला आहे.

6
406 views