
अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती निमित्ताने भावनिक सत्कार
अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती निमित्ताने भावनिक सत्कार
अमळनेर प्रतिनिधी-
देवगाव देवळी येथील ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्तीच्या निमित्ताने नुकताच मराठी लाईव्ह न्यूजच्या वतीने सन्मानपत्र आणि शाल देऊन त्यांचा औचित्यपूर्ण सत्कार करण्यात आला.
अरविंद सोनटक्के या नावामुळे समोर येतो एक शिस्तबद्ध शिक्षक, प्रेमळ मार्गदर्शक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि गरज पडली तर मदतीला धावून येणारा समर्थ सहकारी. गेल्या ८ वर्षांपासून महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे मराठी विषय शिकवून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शब्दांची, संस्कारांची तसेच मूल्यांची बीजे रोपली आहेत.
मराठी सोनटक्के यांच्यासाठी फक्त विषय नव्हता, तर त्यात भावना आणि संस्कृती होती. त्यांच्या शिकवणीत शब्दांसह सौंदर्य, व्याकरणाबरोबर विचार आणि साहित्याबरोबर जीवनाचे धडे मिळत असत.
या सत्कार समारंभाला मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष तसेच मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, तसेच शिक्षक व पत्रकार ईश्वर महाजन उपस्थित होते. उपस्थितांनी अरविंद सोनटक्के यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार स्वीकारतांना सेवानिवृत्त शिक्षक तथा कवी अरविंद सोनटक्के म्हणाले, "मराठी लाईव्ह न्यूजच्यावतीने मिळालेले हा सत्कार माझ्या हृदयात नेहमी राहील. शिक्षक व पत्रकाराचा सन्मान करण्यासाठी मोठे मन लागते. पत्रकार मित्र ईश्वर महाजन यांच्याकडे या अभिनंदनाचे विशेष कृतज्ञता आहे. पत्रकारांनी पत्रकाराचा सन्मान करणे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिनंदनीय गोष्ट आहे."
या उल्लेखनीय सत्कारामुळे अरविंद सोनटक्के यांच्या शिक्षकत्वाचा आणि सेवाभावाचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या कार्याचा भाग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.