logo

५ जूनला बुलढाण्यात शिवव्याख्यान..

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवार ५ जूनला बुलढाण्यात शिवव्याख्यान..
शिवव्याख्याते प्रशांत देशमुख मांडणार प्रतापगड पर्व !

बुलढाणा :
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने शिवराज्याभिषेक ६ जूनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार ५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता किल्ले रायगड येथील प्रख्यात शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे शिवव्याख्यान "गोवर्धन" सभागृह बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेपुढे बुलढाणा येथे होणार आहे. या व्याख्यानातून देशमुख त्यांचे गाजलेले "प्रतापगड पर्व" मांडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व शिवस्मारकावर सकाळी शिवपूजनाने साजरा होणार आहे. शिवराज्याभिषेक दिन पूर्वसंध्येला म्हणजे शनिवार ५ जून रोजी वैचारिक तथा उद्बोधनभर शिवव्याख्यानाचे आयोजन सायंकाळी ७ वाजता "गोवर्धन" बुलढाणा अर्बन सभागृह येथे
"प्रतापगडपर्व" या विषयावर केले आहे.

राज्याभिषेक दिनी म्हणजे रविवार ६ जून रोजी
सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे तर सकाळी ९ वाजता "शिवस्मारक" संगम बुलढाणा येथे शिवपूजन होणार आहे. तरी या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला व शिवव्याख्यानाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, ही शिवविनंती छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

11
296 views