logo

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : लता आणि करिष्मा हगवणेचा मोबाईल अखेर निलेश चव्हाणच्या घरातून जप्त, एकूण 3 मोबाइल आणि बंदूक हस्तगत

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : लता आणि करिष्मा हगवणेचा मोबाईल अखेर निलेश चव्हाणच्या घरातून जप्त, एकूण 3 मोबाइल आणि बंदूक हस्तगत

पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मोबाईल मध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे. आणि ज्या बंदुकीच्या धाकाने निलेश चव्हाणने वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत. ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर काल बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

29
1430 views