logo

जळगाव जिल्ह्यात संघटन मजबुतीसाठी बापुसो उदय वाघांचा आदर्श कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी-डॉ राधेश्याम चौधरी स्व. बापुसो उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव जिल्ह्यात संघटन मजबुतीसाठी बापुसो उदय वाघांचा आदर्श कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी-डॉ राधेश्याम चौधरी

स्व. बापुसो उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली

अमळनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. बापुसो उदय वाघ यांची जयंती तांबेपुरा भागात साजरी करण्यात आली.
यावेळी उदय बापुंचा आठवणींचा उजाळा करण्यात आला, समस्त जळगाव जिल्ह्यात संघटन मजबूत करुन आपली छाप कामाचा माध्यमातून उमटवली आज देखील संघटनेत काम करतांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करायला आवडेल असे डॉ चौधरी यांनी बोलले. बापु म्हणजे कार्यकर्ते घडवणारी चालती फिरती कार्य शाळा होती आम्ही बांपुचा सानिध्यात राहीलो भले थोड्या काळासाठी पण त्यांची शिकवण पक्ष प्रेम व निष्ठा कार्यकरर्त्यांना जीव लावणे हे तत्त्व पालन करण्या जोगे आहे असे प्रतिपादन मा शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी केले
मा. शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमास भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ, डॉ अनिल शिंदे, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, मा जि. प. सदस्य संदिप पाटील,माजी नगरसेवक महेश पाटील, राकेश पाटील, सागर वाघ, दिपक पवार, सदाशिव पाटील, गजानन पाटील, महेंद्र पाटील, अविनाश पाटील, निखिल पाटील, समाधान पाटील, अरमान पिंजारी, किशोर देसले,रूपेश मिस्तरी, लोकेश पाटील,गौरव सोनार, रवि ठाकूर, सागर शेटे, राज माॅडल, उपस्थित होते.

15
6487 views