logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे: मंदिरातील रोकड चोरणाऱ्याच्या 4 स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्यो

पुणे: मंदिरातील दानपेटीमधील रोकड चोरणाऱ्या चोरट्यास केले जेरबंद; स्वारगेट पोलिसांनी कारवाई करुन चोरलेली 30 हजारांची रोख केली जप्त

पुणे : मुकुंदनगर येथील सूर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिराचा दरवाजा तोडून आतील दानपेटीमधील रोकड चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. २३ मे रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.

पुणेः मंदिरातील रोकड चोरणाऱ्याच्य

महादेव तुकाराम गिरमकर (वय ४२, रा. कवठा विकास वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे या चोरट्याचे नाव आहे. मुसकमुकुंदनगरमधील मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या चोरट्याचा तपास पथक शोध घेत होते. ३० मे रोजी स्वारगेट एस टी बसस्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीच्या वर्णनाचे मिळता जुळती व्यक्ती पोलीस अंमलदार शंकर संपते व सागर केकाण यांना पाहून पळून जाऊ लागली. तेव्हा त्यांनी त्याला पळत जाऊन पकडले. त्याच्याकडे चौकशी करत असताना तो सारखा त्याच्याकडील पिशवीस हात लावून ती पाठीमागे लपवत असल्याचे दिसून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीमध्ये रोख रक्कम, लोखंडी हातोडी, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व दोन एक्सा ब्लेड अशी हत्यारे मिळून आली. अधिक तपास करता त्याने मुकुंदनगर येथील देवाच्या मंदिरामध्ये चोरी केली असून ही रक्कम दान पेटीमधील असल्याचे सांगितले. त्याच्याकडून ३८ हजार४०० रुपये व मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यारे जप्त केले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दीपक खेंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत या दुधे यांनी केली आहे.

123
4535 views

Comment