logo

समाज माध्यमातून अनेकांनी केले स्वागत. लातूर :– प्रत्येकाचा वाढदिवस हा आनंदाचा प्रसंग असतो. हा आनंद आपण स्वजनां सोबत स

समाज माध्यमातून अनेकांनी केले स्वागत.

लातूर :– प्रत्येकाचा वाढदिवस हा आनंदाचा प्रसंग असतो. हा आनंद आपण स्वजनां सोबत साजरा करत असतोत. प्रत्येक जण आपल्या आवडी प्रमाणे वाढदिवस साजरा करतो.

लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ दीपशिखा धिरज देशमुख यांचे चिरंजीव वंश यांचा वाढदिवस (२५ मे) लातूर मधील मातोश्री वृध्दाश्रम येथे साजरा करण्यात आला.

लोकनेते विलासराव देशमुख व चि.वंश देशमुख यांचा वाढदिवस तारीख योगायोगाने सोबतच आहे. चि. वंश यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख,धिरज विलासराव देशमुख,सौ.दीपशिखा धिरज देशमुख चि.वंश व कु. दिवियाना यांनी मातोश्री वृध्दाश्रम येथे भेट देवून आजी आजोबां सोबत संवाद साधत काही क्षण व्यतीत केले. यावेळी आजी-आजोबांनी चि. वंश यांची ओवाळणी करून त्यांना शुभ आशिर्वाद दिले तसेच मातोश्री वृध्दाश्रम समिती कडून चि.वंश देशमुख यांचा डॉ. देवधर सरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मुलाचा वाढदिवस अशा अनोख्या पध्दतीने साजरा करून देशमुख कुटुंबाने एक चांगला पायंडा पाडला असल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे.


महाराष्ट्रात खुप कमी राजकीय परिवार असे आहेत ज्यांची पिढ्यानपिढ्या जनतेशी नाळ जुडलेली आहे. त्यापैकीच एक देशमुख परिवार आहे, मुलांना ग्रामीण भागाची माहिती व येथील संस्कृती समजली पाहिजे यासाठी देशमुख कुटूंबिय आग्रही असतात, ज्येष्ठांसोबत वाढदिवस साजरा करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे, सामाजिक भान जपले जात आहे याचा आनंद वाटतो. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया चि.वंश दीपशिखा धिरज देशमुख यांचा मातोश्री वृध्दाश्रम येथे साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने समाजमाध्यमां मध्ये वाचायला मिळत आहेत.

5
111 views
  
1 shares