धक्कादायक ; ऑक्सिजन गळतीने तब्बल २२ जणांचा मृत्यू
नाशिक – नाशिक येथे ऑक्सिजन गळती झाल्याने तब्बल २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे.
ऑक्सिजनची तुटवडा भासत असतांना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak) झाल्यानं ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ रुग्ण दगावले आहेत अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे.