logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गडचिरोली-सिरोंचा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली (प्रतिनिधी)
दि. ३० मे २०२५ — गडचिरोली ते सिरोंचा व सिरोंचा ते आल्लापल्ली मार्गाच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी आज जिल्हा शिवसेना शाखा गडचिरोलीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा. हेमंत भाऊ जम्बेंवार, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवसेना गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे ओबीसी व्हीजेएनटी जिल्हाअध्यक्ष मा. पुंडलिकजी येवले, तालुकाप्रमुख मा. वसंत भाऊ गावतुरे, जिल्हा ओबीसी, व्हीजेएनटी उपाध्यक्ष ईश्वर तिवाडे, सचिव निलकंठ संदोकर, तालुका अध्यक्ष बाळकृष्ण बोरकुटे, मीडिया प्रमुख रामकृष्ण बोरूले, तसेच कार्यकर्ते लोणबलेजी, रुपेश चुदरी, नेपाळ मधमावर, प्रकाश चुधरी संजय काळबांधे व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याचकडे सदर मागणी पोहोचविण्यासाठी हे निवेदन उपजिल्हाधिकारी मा. सूर्यवंशी साहेब यांना सादर करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील अत्यंत खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली.

या उपक्रमासाठी जिल्हा शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र! जय शिवसेना! जय शिवराय!

353
5364 views

Comment