
*जलतारा स्वय सेवक व अंबुजा फाउंडेशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
मिळालेल्या माहितीनुसार
जलतारा स्वय सेवक व अंबुजा फाउंडेशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर परिसरातील जलतारा कोरडे क्षेत्र घोषित गावातील जलस्तर वाढविण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावापैकी जैतपूर या गावी बुधवार दि 28/ 5 /25 पासून जलतारा अभियानांतर्गत खड्डे खोदण्यासाठी सुरुवात केली. जलतारा स्वय सेवक व अंबुजा फाउंडेशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 8.30 वाजता पासून सर्व जलतारा स्वयंसेवक आणि शेतकरी, गावातली मंडळी यांनी गुरुपूजा करून भूमिपूजन केले, जलतारा अभियानाचा पहिला गड्डा करून घेणारे जैतपूर गावचे शेतकऱ्री श्री.मारोती सातपुते यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार केला. गावकऱ्यांनी जलतारा स्वयंसेवकांचं छान स्वागत केल आणि धन्यवाद व्यक्त केला, तुमच्या प्रयत्नाने आणि ईश्वशक्तीने गावातील पाण्याची समस्या सुटेल आणि गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांचे पाण्याचे फार मोठे संकट दूर होइल अशी भावना व्यक्त केली* *जलतारा अभियानाच्या उद्घाटन पर सोहळ्यास स्वयंसेवक श्री. मदनजी डाहाके , श्री भूषणजी कुबडे ,भाऊसाहेब गोतमारे , अभिषेकजी गहरवार , वत्सलभाऊ बांगरे, महेशभाऊ टेकाडे, किशोरजी जुमडे , भुणेश्वरजी बोबडे , निखिल पोटभरे, भावेश वाखोरे, प्रज्वल कडक ,अंबुजा फॉउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी विष्णुभाऊ सूर्यवंशी जैतपूर येथील श्री. मारोती सातपुते, लीलाधर सातपुते, शुभम सातपुते, रवींद्र खोंडे,नवल अलघरे, विशाल खोंडे, गौरव कोसरकर आणि जैतपूर गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.