logo

अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

वार्ताहर
नागपुर ग्रामीण:
लोकनेते माननीय श्री *नितीनजी गडकरी* यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 27/5/2025 रोजी कृषिता सभागृह सावरगाव तह - नरखेड जिल्हा-नागपूर ,महाराष्ट्र येथे पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री चरणसिंगजी ठाकूर आमदार नरखेड काटोल विधानसभा.
तसेच प्रमुख अतिथी श्रीमती संघमित्राताई ढोके महाराष्ट्र शासन ,नगर विकास ,नगरपरिषद प्रशासन ,विभागीय सह आयुक्त .(म.श.प्र.से) आणि मा.श्री मनोजजी कोरडे अध्यक्ष नगर विकास आघाडी नागपूर मा. श्री पुरुषोत्तमजी बोडखे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सत्कार समारंभाच्या प्रमुख मार्गदर्शन श्रीमती *संघमित्राताई ढोके* यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले ,विद्यार्थी जीवनात स्वप्न ही मोठीच बघावी मोठी स्वप्न असेल तर जीवनात व्यक्ती हा आभाळाएवढी उंची गाठतो, मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचतो, अशा तऱ्हेने मार्गदर्शन करतेवेळी विद्यार्थ्यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविला.

40
3849 views