logo

मालेगांव शहर पोलीस ठाणे हद्दीतील ०२ चोरी झालेल्या मोटार सायकल आरोपी सह जप्त*

दि.२३/०५/२०२५ रोजी मालेगांव शहर पोलीस ठाणे हद्दीतुन भरदिवसा शहिद टॉवर, मालेगांव येथुन एक हिरो कंपनीची स्पेंडर प्लस मोटार सायकल अज्ञात इसमाने चोरी केली होती त्यावर दि. २५/०५/२०२५ रोजी मालेगांव पोलीस ठाणे कडील गुरनं. ९७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दि. २५/०५/२०२५ रोजी वर्धमान कॉम्पलेक्स समोरील पार्किंग मधुन एक हिरो कंपनीची स्पेंडर प्लस मोटार सायकल अज्ञात इसमाने चोरी केली होती त्यावर दि. २६/०५/२०२५ रोजी मालेगांव पोलीस ठाणे कडील गुरनं. ९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील गुन्हा घडल्याबाबत मालेगांव शहर पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन, सदर गुन्हयांचे घटनास्थळावरील तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत नामे १) विवेक दिपक सोनवणे उर्फ विक्की, वय २७, रा. जाटपाडे, ता. मालेगांव जि. नाशिक, २) मोहमद काशिफ शेख जलालुद्दीन, वय ३४, रा. करीमनाका, मालेगांव, जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे कब्जातुन गुन्हयात चोरी झालेल्या ०२ मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगांव शहर पोलीस ठाणे कडील पो. हवा. ८८५ योगेश ठाकुर, पो. हवा. २२२३ शेख हे करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंग संधू, सहा. पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे मालेगांव शहर पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, पो.उप.निरी. मोहिते तसेच मालेगांव शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील पो. हवा. सुनिल दांडगे, पो. हवा. ८८५ योगेश ठाकुर, पो.शि. ३७६ पंकज डोंगरे, पो.अं. ८३ गिरीष बागुल, पो.अं. २०१४ रविंद्र काळे, पो.अं. ३०१५ राहुल घुणावत यांनी वरील कारवाई करुन गुन्हे उघडकीस आणलेले आहे.

3
178 views