logo

मालेगांव शहर पो. ठा. हद्दीत सतिष बेअरींग सेंटर, महेश नगर येथे घरफोडी करणारे अटकेत*

शहर पोलीस ठाणे हद्दीत महेश नगर परिसरातील सतिष बेअरींग सेंटर या दुकानात अज्ञात इसमांनी चोरी करुन विविध मोटार सायकलीचे स्पेअर पार्ट बेअरींग, चैन्स, लाईनर, शॉकपपाईप, प्लग, इंडीकेटर, इग्नीशन स्वीच असा एकुण २,४५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणुन मालेगांव शहर पोलीस ठाणे गुरनं. ८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील गुन्हा घडल्याबाबत मालेगांव शहर पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन, सदर गुन्हयांचे घटनास्थळावरील तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार / २०१४ रविंद्र काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत नामे १) सोहेल अंजुम जावीद इकबाल, वय - २१, रा. घर नं. १०७, ग.नं. १, सैलानी चौक, मालेगांव हल्ली रा. हिरापुरा, लाडला फरशीवाला जवळ, मालेगांव, जि. नाशिक यास ताब्यात घेतले असता नमुद संशयीताने वरील गुन्हा हा पाहिजे असलेले आरोपी २) अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चोरवा, रा. पवारवाडी, मालेगांव, जि. नाशिक, ३) मुदरसीर पुर्ण नांव पत्ता माहित नाही, ४) कैसर पुर्ण नांव पत्ता माहित नाही यांचे सोबत केल्याची कबुली दिली असुन त्याचे कब्जातुन गुन्हयात नमुद चोरी झालेला २,४५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगांव शहर पोलीस ठाणे कडील पो.उप.निरी. पवन मोहिते हे करीत आहे.

5
68 views