*श्रीपूर मध्ये श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय समोर पावसामुळे साचलेल्या पाण्यात क्रिकेट खेळताना मुले*
*श्रीपूर*मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत मामांच्या गावाला आलेल्या मुलांना एन मे महिन्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे शाळेच्या मैदानावर साचलेल्या पावसाच्या तळ्यात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे सदर शाळकरी मुलांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे आज पाच वाजता श्रीपूर मध्ये श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय समोर असलेल्या मैदानात अशा साचलेल्या पाण्याच्या नैसर्गिक तळ्यात क्रिकेट खेळताना मुले आपल्याच नादात मनमुराद आनंद घेत क्रिकेट खेळत होती साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पायाला पाणी बादेल किंवा सर्दी पडसे खोकला ताप येईल हे त्या मुलांच्या ध्यानीमनी येत नव्हते ते सर्वजण पाण्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद मात्र लुटत होते मे महिन्यात ऐन कडक उन्हात असे पावसाळी वातावरण पुर्ण मैदानावर पाणी हा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल न येईल पण या वर्षी मे महिन्यात गेला आठवडाभर पाऊस त्याच्या मर्जीप्रमाणे दिवस रात्र केव्हाही कोसळतो आहे हे नक्की