logo

जागतिक समुदायाची नवी पिढी उपजत करतेय खोपोलीतील सनशाईन आंतरराष्ट्रीय शाळा

खोपोली : प्रतिनिधी

शाळा ही मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. कुटुंबानंतर मुलांचे सामाजिक जीवन खऱ्या अर्थाने शाळेपासून सुरू होते. आजपर्यंत शाळा ही समाजाची एक छोटी प्रतिकृती आहे, असे म्हटले जायचे. ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहे. जागतिक समुदायाची नवी पिढी उपजत करण्याचे काम खऱ्या अर्थाने खोपोलीतील सनशाईन आंतरराष्ट्रीय शाळा करत असल्याचे मत शाळेचे व्यवस्थापकांनी व्यक्त केले. शाळेच्या याच बाबी लक्षात घेऊन पालकांनी सनशाईन आंतरराष्ट्रीय शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्याचा मानस धरला आहॆ.

एक उत्तम शिक्षणपद्धती अवलंबण्यासाठी सनशाईन आंतरराष्ट्रीय शाळा एक उत्तम पर्याय असल्याचे पालकांचे म्हणणे आहॆ. आता शाळा म्हणजे जगाची छोटी प्रतिकृती आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल. व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याकरिता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वांत चांगला मार्ग असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी खोपोलीतील सनशाईन आंतरराष्ट्रीय शाळा एक अनोखे अभियान सुरू करीत असल्याचेही सांगण्यात आले.

15
1098 views