logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

माजलगाव च्या माजी आमदार यांचा अपघाती मृत्यू

भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन

लातूर – लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला, ज्यात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे दुर्दैवी निधन झाले.

देशमुख यांच्या कारचा ताबा सुटल्याने वाहनाने सुरक्षा कठडा तोडत तब्बल चारवेळा पलटी घेतली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेले देशमुख यांना तात्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

आर. टी. देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार होते. त्यांच्या अपघाती निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

136
407 views
1 shares

Comment