logo

सामाजिक न्याय विभागाच्या अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकिय निवासी शाळा मुरूम ता उमरगा जिल्हा धाराशिव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाच्या अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकिय निवासी शाळा मुरूम ता उमरगा जिल्हा धाराशिव येथील शाळेत वर्ष 2025 ते 26 करता इयता 6 वी ते 10 वी सेमी इंग्लिश वर्गाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे आव्हान मुख्याध्यापक श्री कुंभार सर यांनी केले आहे. तसेच. इयत्ता 6 वी ते 10 वी वर्गातील ठरलेल्या प्रवर्ग निहाय रिक्त जागांवरच प्रवेश होतील याची पालकांनी नोंद घ्यावी. व प्रवेशकरीता विद्यार्थ्यांचे आरक्षण टक्केवारी अनुसूचित जाती 80%, अनुसूचित जमाती 10%, विभाजन 5 टक्के, एसबीसी आणि दिव्यांग करिता 5 टक्के विद्यार्थ्यांकरता आरक्षण असून भव्य सुसज्ज इमारत , निसर्गरम्य परिसर, तंत्र शिक्षक वृंद, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्ती खेळ आणि खेळाचे साहित्य, मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश , विद्यार्थ्यांकरिता नाष्टा व भोजन व्यवस्था, संगणक प्रयोगशाळा, अद्यावत डिजिटल रूम द्वारे उत्कृष्ट अध्ययन ची व्यवस्था असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिक माहितीसाठी प्रवेश करीता मुख्याध्यापक श्री कुंभार सर
मो:९४२०८३१४८२

96
3198 views